बालमनाचा प्रश्न
बालमनाचा प्रश्न

1 min

6.3K
निळ्या निळ्या आभाळी
काळे काळे ढग कसे ?
उनाड वारे वाहणारा
झाले आता मंद कसे ?
आभाळवर टँकर नाही
पाणी तेथे साचे कसे ?
गगनामध्ये शाॅवर नाही
पाऊस खाली येते कसे?
टपटप खाली पडताना
थेंब हा का भीत नसे ?
झरझर वाहता धरतीवर
पाणी कोठे लपून बसे ?
या मेघाच्या अवताराने
सृष्टी का ती हिरवी दिसे ?
तहानलेला पाणी पिताच
मन का त्याचे तृप्त हसे?
इवल्या इवल्या हातांनी
चला साठवू अमृत हे
बालपणीची मजा भारी
मनी असे का प्रश्न वसे?