*नयनांचे इशारे
*नयनांचे इशारे
1 min
14.4K
साजना आठवतो मला
पहिल्या भेटीचा तो क्षण
जसा वसंतास येतो बहार
तसा झाला नजरेचा प्रहार
साजना आवडली मला
तुझी ती प्रेमाची नजर
सर्वांच्या नजरा चुकवून
हळूच पडे रे माझ्यावर
साजना आवडले मला
तुझे ते नजरेचे इशारे
तुझ्या मिश्किल नजरेने
मी खूप घायाळ झाले रे
साजना आवडली मला
तुझी ती भेटीची नजर
तुझ्या सुखद सहवासाची
जाणीव देते खरोखर
तेव्हाच तुझ्यात जीव दंगला
तुझ्या नजरेत प्राण गुंतला
त्याच नजरेने दिला
हा मौल्यवान शिंपला
