प्रेमे करार तेव्हा
प्रेमे करार तेव्हा
घडता प्रसंग बाका झाला थरार तेव्हा
लढण्या करात घेतो मीही कट्यार तेव्हा
कंटाळलेच होते माझ्या प्रदर्शनाला.
आनंद खूप झाला आला रुकार तेव्हा २
बसते नटून मी पण बघण्यास साजनाला
दिसता कटाक्ष त्याचा प्रेमे करार तेव्हा ३
जाळ्यात पारध्याने डांबून ठेवलेले
दावून दया कुणी मज केले फरार तेव्हा ४
रस्त्यात मित्र 'सागर' मज भेटले पुराणे
वाटेवरून मळल्या तोही पसार तेव्हा
