रोज रात्री
रोज रात्री
1 min
275
का फुले चुरगाळली तू माळलेली रोज रात्री
स्पर्श होता वेदना थरकापलेली रोज रात्री
मी दिवा बघ मंद केला वासनांचा त्याच वेळी
धुंद होतो प्रणय गात्री भाळलेली रोज रात्री
तू फुलां पुसतेस कैसी गंध कोठे तुज मिळाला
चांदणी तेव्हा नभातुन हासलेली रोज रात्री
लागल्या झाडास कैऱ्या मोहराने झाड बहरे
कैफ भूमीला तयाचा मोहलेली रोज रात्री
वागणे वाटे सखीचे वेगळे कशाने सांग 'सागर'
भावते मादक अदाती गंधलेली रोज रात्री
