प्रेमदिवाना
प्रेमदिवाना
मी पाहिली एक नजर
फक्त मलाच शोधणारी :
मला पाहताक्षणी
तृप्ततेने मिटणारी .
विरून गेलो त्यात मी
आकाशाला लाथा मारल्या ;
चंद्र -चांदणी जवळ तिच्या
सौंदर्याच्या गाथा गायल्या .
रसरसते ओठ गुलाबी
मोहविणारे बदामी डोळे ;
तिच्या त्या स्मितहास्याने
मनी निर्मिले प्रेमजाळे .
तिच्या अथांग सागरासम
डोळ्यांत मी पोहून यावे ;
तिच्या गोड गुलाबी नाजूक
ओठांचे चुंबन घ्यावे .
डोळे भरुन पहावे वाटते
मजला तिचं निखळलेलं रूप ;
नाजूक तिच्या कांतीला
सहन होणार नाही धूप .
असा साधाभोळा प्रियकर मी
प्रीत माझी जगावेगळी ;
प्रेमात तुझ्या प्रिये ,
तहानभूक विसरतो सगळी.

