प्रेमात पडलं की
प्रेमात पडलं की
प्रेमातं पडलं की
ह्दयात होते धडधड
गुपित लपवताना
होते मग गडबड
नुसतं तिच दर्शनही
सुखावुन जातं मनाला
नजरानजर झाली की
पंख फुटतात स्वप्नाला
तिच्या जाण्या येण्याच्या वेळेवर
मजनु असायचा वाटेवर
पाॅश कपडे, गाॅगल घालुन
मनात तिच्या नावाचा गजर
ध्यानी, मनी स्वप्नी तिच
होयचा सारखा तिचा भास
उडाली होती झोप
गोड लागतं नव्हता घास
अखेर संपली प्रतिक्षा
नजरेनी दिली प्रेमाची कबुली
काळजातली वाढली धडधड
दोघांची कळी खुलली
भेटिची ओढ, मनी हुरहूर
श्वासांची वाढली लय
बोलक्या भावनांतुन
झाला प्रेमाचा विजय

