STORYMIRROR

UMA PATIL

Romance

3  

UMA PATIL

Romance

प्रेमाला प्रेम कळू दे

प्रेमाला प्रेम कळू दे

1 min
1.2K


प्रेमाला प्रेम कळू दे


प्रेमाला प्रेम कळू दे

सूर तुझे-माझे जुळू दे..... ॥धृ॥


ओठांवर आल्या भावना

माझ्या समजून घे संवेदना

मला तुझा होकार मिळू दे..... ॥१॥


आता हातात दे हात

होऊ दे प्रीतीची बात

तुझ्या इश्कात मला जळू दे..... ॥२॥


चंद्र आला आकाशावरती

प्रेम लिहूया क्षितिजावरती

श्वासांत श्वास मिसळू दे..... ॥३॥


लाभू दे तुझा सहवास

लागली मला तुझी आस

तुझ्या मिठीत सांज ढळू दे..... ॥४॥


तूच माझे हृदय चोरले

मी मनावर तुझे नाव कोरले

नवी पहाट उजळू दे..... ॥५॥



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance