प्रेमाला नाव नसतं
प्रेमाला नाव नसतं
प्रेम तर प्रेम आहे
या प्रेमाला नाव नसतं
कोणी ठेवू ही नये
ह्रदयातला तो श्वास असतं..
या अदभुत करणाऱ्या जगात
फक्त प्रेम उरून वाहतं
ज्यांना समजते भाव मनीचे
तोच प्रेमाला समजू शकतं...
मन आपले धड़कन तिची
ही श्वासात कसं भरतं
प्रीतीच्या या सागरात
अस्मीत जग फसतं..
ना असतं कोणतच नात
परंतू आपल का वाटतं
त्यांच्याच आठवनीत कधीही
स्वप्न सोनेरी सजतं ...

