Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Romance

4.0  

Rakesh More

Romance

प्रेमाच्या सागरात

प्रेमाच्या सागरात

1 min
12.1K


प्रेमाच्या सागरात मी 

चिंब चिंब नाहतोय 

स्पष्टपणे तुला माझी 

पत्नी म्हणून पाहतोय ||0||


कल्पना करतो मी 

तुझ्यामाझ्या संसाराच्या 

वार्ध्यक्यातील तुझ्यामाझ्या 

भावनिक आधाराच्या 

तारुण्यात तर कधी 

वार्ध्यक्यात राहतोय 

स्पष्टपणे तुला माझी 

पत्नी म्हणून पाहतोय ||1||


तुझ्यामाझ्या मिलनाचे 

क्षण सजवताना 

उत्कट आणि भावुक 

चित्र रंगवताना 

तूझ्या प्रेमप्रवाहात 

सुसाट वाहतोय 

स्पष्टपणे तुला माझी 

पत्नी म्हणून पाहतोय ||2||


मिठीत मला तू 

सर्वांसमोर घेताना 

जीवनात माझ्या तू 

हसत हसत येताना 

सर्वकाही तुझ्यासाठी 

हसत हसत साहतोय 

स्पष्टपणे तुला माझी 

पत्नी म्हणून पाहतोय ||3||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance