प्रेमाची निशाणी
प्रेमाची निशाणी
कोरून ठेवली मी, हृदयावरी निशाणी,
प्रेमात मी तुझ्या रे, गाईन गोड गाणी...
हृदयात राहतो अन् , श्वासात वाहतो तू,
राधा अशी तुझी मी, झाले अता दिवाणी...
सत्यात मी जरी रे, नाही तुझी कुणी ही,
स्वप्नात का असेना, आहे तुझीच राणी...
तोडून बंधने ही, घेशील भेट जेव्हा,
तेव्हा तुझ्या दिलाची, होईन रातराणी...
सोडून दूर जेव्हा, गेलास तू कधी जर,
सांगेन मी जगाला, माझी तुझी कहाणी.

