प्रेमाची कहाणी
प्रेमाची कहाणी
सूख दुःखात गातो गाणी
अशी तिच्या माझ्या प्रेमाची कहाणी....
जिवाला मिळे चैन
मनं भरून पाही नयन
तुझ्या हाताने विष पितो
गोड लागतं समुद्राचं पाणी...
आकाशातली चांदणी पसंद
साध्या भोळ्या रूपाचा छंद
पूजा करतो तिच्या रूपाची
मंजूळ तिच्या प्रेमाची वाणी....
तिच्यापुढे परी वाटे काळी
भरे ती प्रेमाने माझी झोळी
देवा मला मिळाली आहे ती
तीचं असे माझ्या ध्यानीमनी....
संकटात होतो मला ती मिळाली
सूख दुःखाची परीभाषा कळाली
तिचा संगमवर जीव अपार
तीचं वेडी माझ्या स्वप्नांची राणी....

