Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

MAHENDRA SONEWANE

Romance

3  

MAHENDRA SONEWANE

Romance

प्रेमाचे इंद्रधनुष्य

प्रेमाचे इंद्रधनुष्य

1 min
12.3K


विचार चांगले होते तुझे, 

कळले तुझ्याशी बोलताना |

तुझ्या वागण्यात प्रेम पाहिले, 

तुला मी समजून घेताना ||1||


तू अधिक खुलली होतीस, 

कधी माझ्यावर रागवताना |

वेडं केलं तुझ्या प्रेमाने, 

तू मला बिलगताना ||2||


सभोवतालचं जग विसरतो, 

मी तुझ्या सोबत असताना |

मनामध्ये आनंद नवा, 

तुला रोज बघताना ||3||


ओठातून पुष्प बहरतो, 

तुझ्या खदखदून हसताना |

आयुष्य जास्त सुंदर वाटते, 

प्रेमाचे इंद्रधनुष्य फुलवताना ||4||


मन प्रफुल्लित होते माझे, 

सौंदर्य तुझ्या डोळ्यातले पाहताना |

नाही सावरता आलं मनाला,

तुझ्या त्या गोड लाजताना ||5||


Rate this content
Log in

More marathi poem from MAHENDRA SONEWANE

Similar marathi poem from Romance