प्रेमाचा ऋतू बाहरला
प्रेमाचा ऋतू बाहरला
पावसाच्या सरींबरोबर प्रेमाचा ऋतू बहरला
मातीच्या गंधाळ सुगंधाबरोबर
तुझ्या स्पर्शाचा सुगंध दरवळला.
बोलके तुझे डोळे मला जवळ घेऊ पाहतात
माझी नजर मिळताच ते कावरे बावरे होतात
उगाच कारण काढून मला जवळ बोलवत आहेस
तूझ्या मनातल्या भावना का सांगत नाही आहेस
तुझ्या कुशीत विसावायला आवडेल रे मला
एकदा तुझ्या भावना सांगून तरी बघ ना मला
एका क्षनाचाही विलंब न करता येईन तुझ्या जवळ
थरथरणारी नजर तुझी जरा माझ्याकडे वळव .

