STORYMIRROR

anagha jagdale

Romance

3  

anagha jagdale

Romance

प्रेमाचा प्रवास

प्रेमाचा प्रवास

1 min
282

तिचा नखराच काही न्यारा,वळवती लोकांच्या नजरा,

त्या रूपगर्वितेचा मोह पडला त्या पावसाला,

त्या सौदंर्याचे रसपान करायला तोही लोकांसवे सरसावला,

जलधारांनी बरसला मेघ तिचे रोम रोम टिपण्याला,

अवचित आलेल्या पाऊसधारांनी बावरलेली ती लागली स्वतःला मिटायला,

चिंब भिजलेली ती हरिणी शोधू लागली निवारा थांबण्याला,

खट्याळ तो पाऊस मग अजून जोमाने बरसला,

तिच्या ओल्या देहावर तो मग दिलखुलास पसरला,

हवाहवासा पाऊस आज जणू वैरी झाला,

तिच्या निथळत्या देहाचे तो नेत्रसुख घेऊ लागला,

अवचित तिला तो दिसला,तिला शोधत घेऊन आलेला छत्री,

नेहमी सुखदुःखात तुझी साथ देईन अशी देणारा खात्री,

सगळ्यांच्या नजरा झेलणारी ती त्याला बघून सुखावली,

पावसाला वेडावत समाधानाने ती त्याच्या छत्रीत शिरली.

आता तो पाऊसही तिला हवाहवासा वाटू लागला,

मृदगंध पावसाचा आता दोघांनाही धुंद करू लागला,

तिच्या केसातून निथळणारं पाणी आणि वातावरणात भारलेला मातीचा सुवास,

त्याला वाटलं हा छत्रीतला संपूच नये प्रेमाचा प्रवास!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance