STORYMIRROR

anagha jagdale

Others

4  

anagha jagdale

Others

बाहुली

बाहुली

1 min
187

इवल्याश्या डोळ्यात मावेल तेवढं आकाश,

स्तिमित होऊन बघत स्वप्ने विणायला सुरवात करते,


ती इवलीशी बाहुली स्वतःला या जगात रुजवू पाहते,

दुडदुड पावलांनी,अवखळ बोलांनी साऱ्या घराला चैतन्य देते,


गोड बोलण्याने मायेच्या बंधाने अवघ्या जगाला बांधून ठेवते,

त्या सुरवंटाचं फुलपाखरु होतांना मात्र आईच्या ह्दयाचा ठोका चुकवते,


छोट्याशा कोकराचं मुग्ध कळीतलं रूपांतर खरंतर खूप सुखावह असतं,

पण आपलं लेकरू मोठं झालं म्हणून आईबापाचं काळीज गलबलतं.


दिल्या घरी सुखी रहा म्हणता म्हणता काळजाचा ठेवा हारवल्यागत होतं,

नवी स्वप्ने जोपासतांना जुनी नाती जपण्यासाठी पिल्लू पण धडपडत राहतं.


बायको,सून,आई अशी अनेक नाती निभवतांना पिल्लू मोठ्ठ होत जातं,

पण आईबाबांच्या डोळ्यापुढे मात्र बाहुलीचंच रुप दिसतं असतं.


Rate this content
Log in