STORYMIRROR

anagha jagdale

Others

4  

anagha jagdale

Others

उद्या

उद्या

1 min
246

उद्या ह्या शब्दात काहीतरी खास आहे,

काहीतरी चांगल होईल याची प्रत्येकाला आस आहे.

आजचाच दिवस आहे बहुदा कष्ट आपल्या आयुष्यात,

उद्या मात्र राजयोग नक्की असणार आपल्या नशिबात.

ह्याच आशेवर माणूस आज दगडावर घाव मारत आहे,

उद्याच्या सुखाच्या आशेवर आज तो घाम गाळत आहे.

आज जन्माला आलेलं बाळ गोड हसत जगाला पाहत आहे,

आईबाबा मात्र त्याच्या उद्याच्या सुरक्षिततेसाठी झटत आहे.

सुरंवटाचं फुलपाखरू झालेलं बघून मायबाप उद्याच्या काळजीत आहेत,

फुलपाखरू राजकुमाराची स्वप्ने बघत झोपलं आहे.

जगण्याची धावपळ रोजचीच म्हणतं आयुष्य घड्याळाशी बांधतोय,

उद्या पासून आराम करायचा ठरवत आज तो काम करतोय.

उद्याची काळजी करता करता खरंतर आयुष्य सरत जातंय,

पण उद्याच्या आशेवरच तर आजचा दिस गोड वाटतोय.

आजचा दिवस मावळला तरी मन निराश होत नाही,

उद्याचा दिवस माझाच असेल असं मन देत ग्वाही!


Rate this content
Log in