ऋतुराज
ऋतुराज
1 min
228
पहाटेच्या समयी सूर्यकिरणांचे धरित्रीवर आगमन,
आम्रवनी ऐकू येऊ लागले कोकीळेचे कूजन,
गोठवणारी थंडी जाऊन आला हवेत मंद गारवा,
पानगळीने ओस झालेल्या झाडांनी ल्यायला साज नवा,
कुठे फुललेला मोहोर, तर वाऱ्यावर झुलणारी रंगीबेरंगी फुले,
शिशीराने सर्द झालेली,पुन्हा टवटवीत झाली मने,
कुठे अंथरला पिवळ्या बहावाचा गालिचा,तर कुठे सडा रक्तवर्णी गुलमोहराचा,
झाडाझाडांवर सजला जन्मसोहळा इवल्या इवल्या पालवीचा,
चैतन्याची नवी पहाट अन् नववर्षात उत्साहाने पडणारे पहिले पाऊल,
मनाला आनंद देणाऱ्या ऋतुराजाचीच ही चाहूल!
