मी समाधानी आहे!
मी समाधानी आहे!
1 min
325
मनातल्या तळ्यात खोल डोकावून पाहिलं,
एका निवांत क्षणी जगाच्या कोलाहलाला दूर सारलं,
समोरच्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याने मला विचारलं,
खूप काही कमवलंस पण अतंरी समाधान लाभलं?
डोळ्यासमोर माझं हसरं घरकुल आलं,
आजवर साथ देणारं मैत्रबन आठवलं,
गळ्यात पडणारे मऊ मऊ हात आठवले,
पाठीवर पडणारे आशिर्वादाचे हात जाणवले,
समोरच्या शांत असणाऱ्या पाण्याला साक्षी ठेवून,
मी सूर्याला हसून सांगितले"हो मी खूप समाधानी आहे"
