आनंदाचा पत्ता
आनंदाचा पत्ता
खूप दिवसांपासून शोधत होते,पण त्याचा पत्ता काही मिळेना,
कुठल्या जागी दडून बसलयं काहीच मला कळेना,
मिळायला तर हवंच आहे,त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,
सगळ्या गल्ल्या पालथ्या घातल्या पण कुठ्ठेच सापडला नाही,
माझ्या जगण्याचं ते टॉनिक असेल असं कुणीतरी सांगितलं,
जगातल्या समस्त सुखांच हेच रहस्य असंच मी वाचलं,
कुणी म्हणे पहाडावर,तर कुणी म्हणे आश्रमात,
कुणी म्हणे तळ्याकाठी तर कुणी म्हणे राऊळात,
अस्वस्थतेचे अनेक आवर्त,अन् त्याच्यासाठी मी तृषार्त,
एकटाच शोधत बसलो असता अवचित मला तो दिसला,
लहानग्यांच्या चेहऱ्यावर खेळतांना तो बागडत होता,
कष्टकरी माणसाच्या थकलेल्या चेहऱ्यावर भाकरी खातांना तो होता,
आजीआजोबांकडे नातवंडांचे हात धरून जातांना होता,
मित्रमैत्रिणींच्या गप्पात तर धबधब्यासारखा होता,
नवराबायकोच्या चोरट्या प्रेमळ कटाक्षात होता
तो तर सर्वत्र होता फक्त माझ्याच डोळ्यावर दुःखाचा काळा चश्मा होता,
आणि अखेर मला आनंदाचा पत्ता सापडला होता.
