STORYMIRROR

VINAYAK PATIL

Romance

3  

VINAYAK PATIL

Romance

प्रेमाचा पाऊस

प्रेमाचा पाऊस

1 min
182

कातर वेळेचा वारा 

आठवणीने भेटतो

काळोख येता गारवा

पाऊस मनी दाटतो ||१|| 


मज आवडे पाऊस 

मायने फुलवणारा 

तेवढ्याच ताकदीने

बाभळीला पेलणारा ||२|| 


पाऊस आवडे मला

तुझ्या माझ्या संगतीचा 

बरसतोय अंगणी 

फुलला गंध चाफ्याचा ||३|| 


पावसात भिजताना 

स्पर्शे मज गार वारा 

अशा एकट्या जीवाला 

फक्त तुझाच सहारा ||४|| 


प्रेमाच्या पावसातुनी 

भिडे नजरा नजर 

जीव जडे तुझ्यावरी 

घायाळ करे नजर ||५|| 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance