STORYMIRROR

Murari Deshpande

Romance

3  

Murari Deshpande

Romance

प्रेमाचा नवस......

प्रेमाचा नवस......

1 min
253

तुझ्या होकारासाठी गं देव ठेवले पाण्यात 

नाव गुंफिले कितीदा तुझे छान मी गाण्यात 


तुझ्या नावाचा गं राणी जप केला कोटी कोटी 

रात्री डोळाही लागेना तुझे नाव मात्र ओठी 


अन्न पाण्याने मांडला उभा माझ्याशी गं दावा 

प्रेमरोग काय असे तुही अनुभव घ्यावा 


जळी स्थळी ध्यानी मनी मला फक्त तुझे वेड 

तुला गाठावे कसे मी तुला सुरक्षा गं ‘झेड’


बाप पैलवान तुझा माय कजाग भारीच 

त्यांच्या रूपाने समोर उभी समस्या न्यारीच 


पण लावणार आता माझा प्राण मी पणाला 

तुला आणिन घरीच यंदा दिवाळी सणाला! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance