प्रेम
प्रेम
प्रेमाचे सुंदर सुंदर स्वप्न बनून,
सतत स्वप्नात तुझ्या येऊन,
तुला सतावत राहीन मी।
प्रेमाचे मोहक मादक रूप बनून,
सतत तुझ्या डोळ्यासमोर येऊन,
तुला मोहून टाकीन मी l
प्रेमाची गोड गोड गाणी गुणगुणत,
सतत तुझ्या कानाजवळ,
येऊन गुंजत राहीन मी l
प्रेमाचा गोड मधुर रस बनून,
सतत तुझ्या ओठांवर ओलावा,
बनवून राहीन मी।
प्रेमाचे तुझ्या अंगावर झालर बनवून,
सतत तुझ्या अंगावर ओढून,
लपेटून राहीन मी l
प्रेमाची गरम-गरम ऊब बनून,
सतत तुझ्या कुशीत,
मिठीत राहीन मी।
प्रेमाच्या मायेची सुखद सावली बनून,
सतत तुझ्या आसपास,
फिरत राहीन मी l
प्रेमाचा जीवन रस बनून,
सतत तुझ्या शरीरात नसात,
वाहत संचार करत राहीन मी।
प्रेम प्रेम आणि फक्त प्रेम बनून,
सतत तुझ्या काळजाची धडकन,
बनवून, धडकत राहीन मी।

