प्रेम
प्रेम
कधी अव्यक्त भावनांच
निशब्द प्रेम असतं...
निशब्द प्रेम ते
मनामध्ये प्रत्येकाच्या असतं...
सुंदरता काय असते
ते प्रेमामध्ये कळत...
प्रेमासाठी त्या
रक्त ते सळसळत....
अतूट जपलं जाणार प्रेम
काळजात खोलवर रुजलेल असतं...
पाषाणाच्या दगडालाही
प्रेमाचा पाझर फुटत....
डोळ्यांची भाषा ती
प्रेमामध्ये बुडून जाते...
पापण्यांच्या उघड झापेत
दोन जीव एक श्वास होऊन जाते...
प्रेम ते प्रेमच असतं
हळूवार ते जपलं जातं...
मनाच्या हळव्या पडद्यामागे
ते बघितलं जात...

