प्रेम
प्रेम
अबोल जरी असले
तरी ते प्रेम आहे...
अंधारी रात्रीत
ते स्वप्न आहे....
उन्हाचा तो तापणारा
सूर्य डोईवर....
कणखर प्रेमाचं पाऊल
आहे ह्या भुईवर....
शब्दांना अर्थ लागत गेला
जेव्हा तिला पाहिल्यावर....
सर्व काही विसरून गेलो
तिच्या सोबत राहिल्यावर....
दोन जीवांची आस
चांदण्या रात्रीस झाली...
ओढ तिची
न राहून आली...
प्रेमात तिने साज घातल
तिच्या रूपाचा भास लागला...
एकांतातलो मी
प्रेमात गुंतून गेलो सगळा...

