STORYMIRROR

Supriya Devkar

Romance

3  

Supriya Devkar

Romance

प्रेम

प्रेम

1 min
134

कुणा नकळे कसे उमले

 प्रेम माझ्या अंतरंगात

रंगून गेलो नखशिंखात 

तुला पाहता या सुखात


नजर भेट घडली अशी

 विसरलो श्वास क्षणभर

भारावलेे वातावरण सारेे

 बागडूू लागे मनाचा भ्रमर


आवडे सहवास तुझा

 संवाद वाटे मन मोकळा

 गर्दीतला कटाक्ष तुझाा

 भासे मज स्वप्न सोहळा


तुझ्या बटांवर जडेे प्रीती

 वाऱ्यासंगे खेळती जेव्हा

खांद्यावरती रुळताना वाटे

 स्पर्श त्यांचा होईल केव्हा


तुझ्यामुळे वाटे प्रेमात गोडी

 दोन हृदयांची हळुवार जोडी

उगाच करून बहाणे 

 नको काढूस नसत्या खोडी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance