प्रेम
प्रेम
प्रेम पहिलं वहिलं
असं हे नवलाईचं
गुलाबाचं गंधपुष्प
रंग गंधित मोहाचं (1)
किती ही फुलपाखरे
भिरभिर फुलांवरी
आकर्षक रंग गंध
खेचायची अदाकारी (2)
जीव ओवाळून टाके
कोणी कसे कुणावर
मनातले गूज मात्र
अडतसे ओठावर (3)
नजरेला भिडताच
तिचे सुंदर नयन
सांगून जाती हे
मनातील आवर्तन (4)
झोप तर उडलेली
कसे सांगू मनातले ?
अवचित हो सामोरे
प्रेमपाश बाहूतले (5)
प्रीत बावरी रेशमी
धागे गुंततची जाती
गोफ नात्यांचे सजती
प्रेम जोडी नवी नाती (6)

