STORYMIRROR

R U Salunke

Romance

3  

R U Salunke

Romance

प्रेम...

प्रेम...

1 min
172

सखे, प्रेम माझे जडले तुझ्यावर, 

तुझ्याच आठवणीत रमलो मी.. 

नकोच आता दुसरे काही, 

विरहाच्या डोहात डुबलो मी.. 1


मारल्यात चकरा मी त्या दारी, 

नेहमी कुलुपानेच स्वागत केले.. 

त्याला मी ही नमस्कार केला, 

म्हणणे माझे त्यास अवगत झाले.. 2


तू म्हणालीस होती मला, 

येईल मी नक्की त्या बागेत.. 

तू आली नाहीस आजुन तरी, 

तीच फुले डोलत आहे रांगेत... 3


तुझा मी कृष्ण बसलो एकांतात, 

नजर लावून त्या फुलांवर.. 

पाखरे ही गुणगुणत आहे, 

थंड वारा स्पर्श करे गालांवर.. 4


ही धरती, हे आकाश वाटे कोरडे, 

तू आलीस तर भरतील त्यात रंग.. 

विसरून सार्‍या जगी आपण, 

धुंद वार्‍यात, मस्तीत होऊ दंग.. 5


मला विश्वास आहे त्या प्रेमावर, 

जे जगाने केले, अनुभवले.. 

आपण थोडी अपवाद होऊ, 

जे आजवर आपण निभावले.. 6


सखे, तुझी भासे मला उणीव, 

प्रेमाचा भुकेला मी तुझा.. 

येशील आणि देशील मला प्रेम, 

हा प्रेमावरील विश्वास माझा... 7


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance