प्रेम व्यथा
प्रेम व्यथा
जळतेय मीही राजा सांगायला हवे का ?
करतेय प्रेम तेही सांगायला हवे का?
मी मानले तुला रे सर्वस्वी आपले रे,
तू जाणली न माझ्या मनाची व्यथा रे ।।
मी वाचले तुझ्या डोळ्यातील भाव,
तू वाचणार केव्हा मनातील प्रेमभाव,
जळण्यातील व्यथा उमजून तू घेणा,
विरहातील दशा माझी संपता संपेना ।।
अनुराग तव प्रेमाचा वर्षाव करशी केव्हा,
तप्त या धरेला तू घेशी कवेत जेव्हा,
विद्दुलतेपरी तीही बिलगेल तुझिया देहा,
बरसेल ती हर्षाने जणू कोसळे प्रपात हा ।।
तू येऊनि झडकरी देऊनि आलिंगना,
देह एक होती अशी गच्च मिठी देणा,
स्विकार करुन प्रेमा मज आपली म्हणा,
हीच प्रार्थना करुनि साधना पुरवी कामना ।।

