STORYMIRROR

Ajay Chavhan

Romance

3  

Ajay Chavhan

Romance

प्रेम तुझे हवे.....

प्रेम तुझे हवे.....

1 min
271

रूप सावळाच माझा

परी सावळा नसे मन ।

प्रेम हवे तुझे मज

नको सखे तुझे हे धन ।।

अर्पियले मनोभावे तुज

माझी ही खरी प्रिती ।

जाणून घे मज सखे गं

नाही माझी ही रणनीती ।।

वाटे तुझ्यासह जगावे

मरावे ही तुझ्यासहच ।

मन ही तुझा मज हवे

नाही गं फक्त देहच ।।

साजेल आपली जोडी

राधा आणि कृष्णा वाणी ।

चल लिहू स्वर्णाक्षरांनी

आपली ही प्रेमकहाणी ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance