प्रेम (रोज डे)..!
प्रेम (रोज डे)..!
तुला सांगण्याची गरज नाही
तुला जाणण्याची गरज नाही
तुला पाहण्याची गरज नाही
तुला माझी गरज नाही
अस कधी होणार नाही
अस कधी असणार नाही
अस कधी वाटणार नाही
अस कधी घडणार नाही
बघ हा गुलाबही तेच सांगतो
काटा रुतला तरी तो
कधी खुपला नाही
कधी दुखला नाही
कधी सलला नाही
काटा रुते कुणाला
असे कधी घडले नाही
म्हणून तर वेडे
प्रेमाला आपल्या
पंख फुटले नाहीत
अंकुर कधी खुंटले नाहीत
ते तसेच वाढत वाढतच राहिले
रोज डे साठी बघ
ते फुलून आले
खुलून आले
रोज डे चे वेडे
प्रेम तुझ्यासाठी
घेऊन आले.....!

