प्रेम म्हणजे काय असतं...
प्रेम म्हणजे काय असतं...
प्रेम हे जीवन असत
एकाच तन दुसऱ्याच मन असत....
प्रेमात विसरत सारं भान
भूक लागे ना कधी तहान
प्रेम दोन जीवांच मिलन असत....
प्रेमी असतात खुप मजबूर
साऱ्या आशा करे प्रेमात चुर
प्रेमात विश्वासाच जतन असत....
एकमेकांची केली जाते कीव
दूराव्यात ही लावतात ते जीव
साऱ्या त्रासाच प्रेम कथन असत....
प्रेमात गोड लागत सार दुःख
पाहताच प्रियसीला मिळे सुख
प्रेमीकेच प्रेम अनमोल रतन असत...

