प्रेम माझे कळेल का तुला?
प्रेम माझे कळेल का तुला?
प्रेम माझे
कळेल का तुला ?
सांग मला !
कानात......
बहर असा
गंध त्यात तुझा
श्वास माझा
गुंतलेला.....
हातात हात
असावी साथ तुझी
प्रीत माझी
विश्वासाची......
तुझे हास्य
चांदण्यात ते खुलावे
ओंजळीत दयावे
दान......
भावना माझ्या
जाणून तू घ्याव्यात
आणि घ्याव्यात
आणाभाका....

