STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Romance

3  

shubham gawade Jadhav

Romance

प्रेम क्षणात होत ❤️

प्रेम क्षणात होत ❤️

1 min
397

कोण म्हणत प्रेम क्षणात होत नाही

जेव्हा मी तिला पाहिलं

मला क्षणात प्रेम होऊन गेलं

आयुष्यभरासाठी तिनं हृदयातली

एक जागा पक्की केली


ती हसत होती मी तिला पाहत होतो

हळदीसारखा पिवळसर रंग 

पाणीदार डोळे, काळसर केस

क्षणात मनात बसणार रूप पाहून

आपसूकच मला प्रेम झालं


सौंदर्याची खाण, लावण्यवती,

नक्षत्रासारखी रुपवान सुरेख

द्याव्या तेवढ्या उपमा तिला

कमी पडतील इतकी छान

कोणालाही क्षणात खेचून घेणारी सौंदर्यवती


देवाचं एवढे अप्रतिम कोरीवकाम

डोळ्यांसमोरून ओझल होऊ नये असं वाटत होतं

अचानक ती तिथून निघून गेली

मन उदास झालं पण

त्या काही क्षणात मला तिच्यासोबत प्रेम झालं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance