प्रेम असावं
प्रेम असावं
देशावरती भारतभूच्या लेकरापरी.
प्रेम असावं........
मातृभूमीवरती मातृप्रेमाच्या लेकरापरी.
प्रेम असावं........
आईवडिलांवरी मातृत्व वात्सल्यापरी.
प्रेम असावं........
कुंटूबावरी मातृत्व छायेपरी.
प्रेम असावं........
लेकरावरी हिरकणीच्या मातृत्वापरी.
प्रेम असावं........
बांधवावरी श्रीराम लक्ष्मणाबंधू प्रेमापरी.
प्रेम असावे.........
भागिनीवरी कृष्णद्रौपदी नात्यापरी
प्रेम असावं
स्वतः वरी आत्मविश्वासाच्या नात्यापरी.
प्रेम असाव........
प्रेमावरी त्यागात आनंद मानण्यापरी.
प्रेम असावं........
जनलोकावरी माणसात देव शोधण्यापरी.
प्रेम असावं ........
विश्वावरी विश्वची माझे घर मानण्यापरी.

