STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

प्रेम आणि वास्तव

प्रेम आणि वास्तव

1 min
156

तुझे स्वप्न पाहतांना

कळी गुलाबी फुलली

नभी धुमकेतू आले

रात्र काळी उजळली

तुझा स्पर्श झाला आणि

दार भाग्याचे खुलले

कसे कोणास ठाऊक

दैव माझे पालटले

डाव माझा हारलेला

कसा जिंकलो कळेना

हात हातात सखीचा

तरी उत्तर मिळेना

ऋतू माझा बहरला

झाला हिरवा उन्हाळा

ऐन वैशाख मासात

सुरू झाला पावसाळा

प्रेम आहे तुझ्यावर

जरी वणवे पेटले

तुझ्या मिठीत साजणी

मोठे वादळ शमले

भान वास्तवाचे नाही

पर्वा जगाची कुणाला

तोडू बंधने जातींची

धर्म प्रेमाचा आपला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance