पंख आशेचे
पंख आशेचे
पडली निराशा पदरी जरी
पराजयाने केले हताश तरी
प्रारंभ करू नव्याने
अनुभवाने करू सुरवात
करुनी निर्माण मनी जिद्द
अपेक्षेच्या पक्षासवे
निर्धास्त होऊनी
उंच भरारी घेईन मी
मनाला देऊनी धिर
आशेचे पंख घेऊनी
जगण्याची उम्मेद पाहीन
मिळवेल माझे लक्ष मी
सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर
करुनी मात संकटांवर
वाटचाल करू प्रगती पथावर
घेऊनी पंख आशेचे
