STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Children

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Children

पक्ष्यांनो तुम्ही

पक्ष्यांनो तुम्ही

1 min
251

पक्ष्यांनो तुम्हाला कधी श्रीमंत व्हावे असे वाटत नाही काय?

सारे विश्वच तुमचे, कधी कुठल्या जागेवर हक्क दाखवलाय काय?


तुम्हाला खूप सारी जमीन, पैसा नको नकोसा वाटतो काय?

तरी क्षणभंगूर सुखासाठी, रक्ताची नाती मारामारी करून सोडली काय?


तुम्हाला संताचे सानिध्य, विचार सतत कधी लाभले काय?

तरी तुम्ही इतके खूप बुद्धीमान आणि संस्कारीत कसे काय?


नित्याचे आचार, विचार तुमच्या पिढ्याना कोणी शिकवतात काय?

तरी तुम्ही कधी कुणाला, शिव्या, वेदना तरी दिल्या काय?


उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतू तुमच्यासाठी आव्हान नव्हे काय?

तरी तुम्हाला सिमेंट कॉंक्रीटची घरे कायम नको असते काय?


संगणक आले, सारे मानवी जग सुखसाधनात रमते काय?

तरी तुम्ही तुमच्या नात्यात, राहणीमानात बदल केला काय?


सर्व मानवजातीत माणूस आपल्या मुलांची काळजी करतो काय?

तरी तुम्ही उडते पंख आले की बाळांना कायम सोडून जातात काय?


मानवाला सतत चिंता मुलांच्या शिक्षणाची आणि नोकरीची नव्हे काय?

पक्ष्यांनो तुम्हाला अशी कधीतरी चिंता, जबाबदारी वाटते काय?


सहज कमावलेल्या धनाची पुढची पिढी योग्य नियोजन करते काय?

पक्ष्यांनो तुम्ही धन कमवत नाही याच्यामागे रहस्य काय?


तरी पक्ष्यांनो तुम्ही काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर कधी शिकलेत काय?

तरी निसर्गाचे आचरण, नियम, तंतोतंत पाळतात तरी कसे काय?


इंटरनेटच्या जगात, तुम्हाला मोबाईल कधी माहिती आहे काय?

पक्ष्यांनो तुम्ही तरी त्याचे गुलाम होऊन स्वच्छंदी जीवन संपवताय काय?


आळस झटकून कष्ट करण्याची उमेद लहान वयात पाखरांना देतात काय?

पक्ष्यांनो तुम्ही आमचे मार्गदर्शक तरी सतत होणार काय?


आमच्या सुंदर, सुखी हरवलेल्या जीवनाची गुरुकिल्ली होणार काय?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational