STORYMIRROR

Vasudeo Gumatkar

Fantasy

4  

Vasudeo Gumatkar

Fantasy

पिंपळ

पिंपळ

1 min
284

रोज पिंपळावर त्या

पक्षांची शाळा भरत जाई

गुण्यागोविंदाने सर्व 

मंजुळ गीत गाई


उंच शेंड्यावर झाडाच्या

बगळा दिमाखात बसायचा

पांढराशुभ्र रंग त्याचा

किती खुलून दिसायचा


झाडाची हिरवीगार पर्ण

हवेसोबत झुलायची

फांद्यांवर झाडाच्या

मर्कट पिल्लं खेळायची


बगळे, कावळे, चिमण्या

खूप काही बोलायचे

जणूकाही सर्वजण

पाढे गुणगुणायचचे


कऱ्हाडीचे वार करून

माणसाने पिंपळ तोडला

आनंदाने खेळणाऱ्यांचा

डाव मध्येच मोडला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy