Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shobha Wagle

Classics Others

3  

Shobha Wagle

Classics Others

फुलतो श्रावण

फुलतो श्रावण

1 min
180


गोपाळांच्या हर्षामध्ये हसतो श्रावण

वसुंधरेच्या अंर्तयामी रुजतो श्रावण

तहानलेल्या धरेस मिळते निर्मल पाणी

सृष्टी मधल्या हिरव्यारानी फुलतो श्रावण

शेतकऱ्यांची धान्य पेरणी आनंदाची

हिरवाईच्या शेतामध्ये डुलतो श्रावण

रिमझिम धारा, क्षणात येई तो रविराजा

कमान रंगित इंद्रधनुष्या भरतो श्रावण

शुभ्र झऱ्याचे झुळझुळ पाणी कडे कपारी

उंचावरुनी मस्त धबधबा उडतो श्रावण

उपास तपास व्रत पुजनाचा श्रावण महिना

देव देवता मांगल्याचा असतो श्रावण

प्रत्येकाच्या विश्वासाने पूजन होते

सजावटीच्या फुलवारीने सजतो श्रावण.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics