STORYMIRROR

Savita Kale

Romance

3  

Savita Kale

Romance

फुलपाखरू

फुलपाखरू

1 min
11.9K

नाजूक, रेखीव, कोमल सुंदर

पंख हलवीत उडे सभोवर

रंगाची उधळण पंखावर

रुप तयाचे दिसे मनोहर


नाद फुलांचा तयासी भारी

पिंगा घाली भिरभिर करी

मध्येच झुकुनी बसे फुलांवरी

मधुर रसाचे सेवन करी


फुलासारखे शोभा असे त्यामुळे

वैभव फुलांचे ती फुलपाखरे

चपखल, चंचलता अंगी

नजर खिळते पाहता नजारे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance