फसवे प्रेम
फसवे प्रेम
प्रेम करणारे या जगात खूप भेटतील
पण तुझ्या पोटाचा विचार करणारे फार कमी असतील
बॉयफ्रेंड म्हणून तुझ्यासोबत राहतील
पण थोड्याच दिवसात कामवासना जागृत करतील
अनेक बहाणे सांगून तुला भेटायला येतील
पण त्यात हिऱ्यासारखे तुला पारखावे लागतील
तुझ्या सौंदर्याचा मध चाखायला सगळे येतील
पण जगण्याला आधार देणारे नसतील
खोटे प्रेम, प्रतिष्ठा तुला दाखवतील
खरे आयुष्य जगताना तेच दगड मनाचे होतील
तुला खोट्या प्रेमात भुलवणारे अनेक भेटतील
पण कठीण प्रसंगात पळ काढतील
तुझ्या सुंदरतेला भाळून तुला अनेक स्वप्न दाखवतील
पण त्यांचे स्वप्न कधीच खरे नसतील
तुझ्याकडे येऊन शिणभाग काढतील
पण तू आज जेवली का? हे विचारणारे फार कमी असतील
अनेकांच्या नजरा तुझ्यावर भाळतील
पण त्या स्वार्थी आणि खोट्या असतील
प्रेमात विश्वास, दया, काळीज समजनारेच तुझे असतील
बाकी तुला सर्व फसवून जाणारे असतील