फक्त मित्र आहे
फक्त मित्र आहे
माझ्याशी हे असे घडते विचित्र आहे,
डोळ्यांपुढे जे माझ्या, फक्त तिचेच चित्र आहे.
वर्णिताना तिला, माझे शब्दही पडती अपुरे;
हाती जे आजही, तिचेचं अपूर्ण पत्र आहे.
कटाक्षाने एका तिच्या, पडते भूरळ हृदयाला आजही;
वळून बघता एकदा तिनं, मी ही बहूधा पुन्हा 'पात्र' आहे.
आठवणींतल्या क्षणांची, आता किंमत ती न्यारी;
पण विखुरलेल्या वस्तीत या, काळोखं सर्वत्र आहे.
प्रत्येक दिवस माझा, मोहरतो तिला भेटण्याच्या तृप्त आशेने;
पण स्वप्नांच्या या गंधात ही, बहरलेली प्रत्येक रात्र आहे.
करून भक्कम सोबत, इतकी वर्षे ओळखून एक-मेकाला,
खंत अखेरीस याचीच, की अजूनही मी तिचा 'फक्त मित्र आहे'.

