पहिल्या पावसाच्या निमित्ताने..
पहिल्या पावसाच्या निमित्ताने..


पहिल्या पावसाच्या निमित्ताने घराबाहेर पडलोया
अनोळखी कोण तरी नवीनचेहरा कॉलनीत आलाया.....!
माझ्या मनात विचारांनी काहूर माजून उठलया.
वादळं कमी डोळ्यात तिला पाहून वीज चमकतीया.......!
कसं बोलायला जाऊ मला भलतंच पावसाच्या पाण्यानी
तिच्या घरच्या रस्त्यावर आणून सोडलया.....!
पहिल्या भेटीत तिला काय सांगू माझी जीभ कुठं सांगायला रेटतिया
छातीत धडधड वाढलीया.....!
मला असं वाटतंया तिला घेऊन पावसात ओलंचिंब होऊ या.
गारव्याच्या सहवासात गारांची एकमेकांना मारपीट करून प्रेमात दुगुणीत आनंद लुटू या.....!
पहिल्या पावसाच्या योगाने आमचा योग जुळून आलाया
तुझ्या शब्दापुढे कुठं मी जातोया आपल्या दोघांचं नशीब झकास साथ देतया.....!
आमचं प्रेम बघून गाव जळतंया पावसाच्या पाण्यानी त्यांची आग विजतीया.
चिखलाची साचलेली मने सगळ्यांची धुतलीया......!
पहिल्या पावसाने आमच्या प्रेमात बहर आलिया.
निसर्ग सौंदर्य शोभा देतया.....!