STORYMIRROR

VINAYAK PATIL

Romance

3  

VINAYAK PATIL

Romance

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

1 min
165

प्रेमापासून मी दूर 

वाटे मला खूप भीती 

आपल्याला नाही जमे 

प्रयत्न खूप करती ||१|| 


एक दिस आला क्षण 

प्रथम तूला पाहिले

मनात उठे वादळ 

मन माझे भांबावले ||२||


तूला पाहताक्षणीच 

पडलो तुझ्या प्रेमात

त्याचवेळी ठरवलं 

तूच माझ्या जीवनात ||३|| 


वाटलं सांगाव तिला 

पण कसं ते कळेना 

तूला पाहिल्याविनाच 

मलापण करमेना ||४|| 


असे हे पहिले प्रेम 

बोलण्या आधी संपलं 

आशा‌ कशाला करावी 

जे नसे कधी आपलं ||५||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance