STORYMIRROR

प्रतिभा बोबे

Fantasy

3  

प्रतिभा बोबे

Fantasy

पहिली भेट

पहिली भेट

1 min
630


पहिली भेट


पहिली भेट माझी जेव्हा कवितेशी झाली

खर सांगू मनकल्पनांना मोकळी वाट मिळाली


पहिल्या भेटीतच मनीची कळी खुलली

कविता जेव्हा माझ्या मनातलंच बोलली


नवनवीन विषयांशी हिच्यामुळे ओळख झाली

शब्दांची सुरेख गुंफण कविता माझी फुलली


भावना कुठल्याही कवितेतून होती व्यक्त

न बोलताही प्रत्येक कल्पना शब्दांतून झाली मुक्त


नसती झाली पहिली भेट कवितेशी

नसती मिळाली जी आता मिळते आहे खुशी



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy