पेटवा शेकोटी
पेटवा शेकोटी
राया पेटवा शेकोटी पिरतीची
पेटवा शेकोटी...!!
असे हुडहुडी भरली राया
जवळ याया झुरते काया
आलिंगनाची शाल घाला
सांगे नजर चोरटी
गं सांगे नजर चोरटी
अहो राया पेटवा शेकोटी
पिरतीची पेटवा शेकोटी!!
बघा नभात निजला चांदवा
या-ना पिरतीच्या दवात भिजवा
शेज फुलांची वाट पाहे एकटी
गं वाट पाहे एकटी
अहो राया पेटवा शेकोटी
पिरतीची पेटवा शेकोटी!!
नका साजणा असे बावरू
ह्या थंडीला कशी सावरू?
घाला विळखा,मदनाचा हो
कापते ही कटी,
गं माझी कापते ही कटी
अहो राया पेटवा शेकोटी
पिरतीची पेटवा शेकोटी
अहो या ना राया पेटवा शेकोटी !!

