STORYMIRROR

Kishor Zote

Classics Others

3  

Kishor Zote

Classics Others

पैसे( अभंग रचना )

पैसे( अभंग रचना )

1 min
244

किंमत व्यक्तीची । होतसे पैशात ।

स्थान समाजात । ठरवती ॥ १ ॥


चणचण भासे । नेहमीच आता ।

नोट ती मोडता । खर्च होई ॥ २ ॥


गरज सर्वांची । हाव ती पुष्कळ ।

असावा बक्कळ । हाती पैसा ॥ ३ ॥


कोणत्याही मार्गे । कमवती पैसा ।

नराधम ऐसा । तो होतसे ॥ ४ ॥


किशोर पाहतो I धोका असा घडे ।

नात्याला ही तडे । पैसे देतो ॥ ५ ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics