पैंजण
पैंजण
हात बांगड्यांनी भरलेले
कुंतलाची बट झाकी कपाळ
रूप तुझे मोहक असे
पैंजण नाद करी घायाळ
तुझ्या पैंजणाचा ताल
जणू मलाच इशारे करतो
ओळख नसतानाही
लक्ष का बरे वेधतो?
तुझ्या सुंदर गोऱ्या पायावरून
हटत नव्हती माझी नजर
घुंगरांची छमछम विसरायला
लावी सारेच क्षणभर
असे वाटते तुला माझ्या
प्रतिसादाची प्रतिक्षा
बोलावे माझ्याशी काहीतरी
हीच माझी अपेक्षा
श्वास गहिवरून येई
ऐकून पैंजणाचा स्वर
सजवशील का माझे
आयुष्यभरासाठी घर?

