STORYMIRROR

Vijay Sanap

Romance

3  

Vijay Sanap

Romance

।। पावसात ती अन् तो ।। (अष्टाक

।। पावसात ती अन् तो ।। (अष्टाक

1 min
28.5K


भिजे तीच पावसात

रान माळ त्याच्या संगे

रानी वनी फिरतांना

गार वारा अंगा झोंबे ।।


कसा बरसे पाऊस

संगतीत भिजतांना

चिंब चिंब अंग ओले

एकमेका लाजतांना ।।


पावसात भिजतांना

बांधे प्रेमातल्या गाठी

सरी घेऊन सोबती

तूच उभा माझ्या पाठी ।।


आला पाऊस पाऊस

ढग जसे जिरायाचे

प्रेम कहानी सांगता

मन माझे रमायाचे ।।


पावसात मोर नाचे

तिचा फुलला पिसारा

अंग सारे भिजलेले

त्यांना खूणवतो वारा ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance