पावसात भिजू चला
पावसात भिजू चला
गडयांनो, पावसात भिजू चला।
पावसाचा आनंद घेऊ चला ।।धृ।।
उन्हाळ्यात सूर्यदेव खूप तापला
खूपच साहिल्या उन्हाच्या झळा
पावसात थोडे थंड होऊ चला
पावसाचा आनंद घेऊ चला ।।१।।
आकाशात काळे काळे ढग जमले
विजांचे दिवेही चमकू लागले
ढगांचे संगीत कानी ऐकू चला
पावसाचा आनंद घेऊ चला ।।२।।
सरीवर सरी येती उंचावरुनी
गारा तडतडती ताल धरुनी
गारांसवे आपणही नाचू चला
पावसाचा आनंद घेऊ चला ।।३।।
पाण्यात सोडू कागदाची होडी
होडी पाहून मनाला वाटेल गोडी
होडीत बसून पैलतीरी जाऊ चला
पावसाचा आनंद घेऊ चला ।।४।।
